Monday, August 15, 2016

MASI Vaastu - मासी वानप्रस्थ - वृद्धाश्रम

वानप्रस्थ वृद्धाश्रम –
का व कसा ?

भारतीय संस्कृतीत चार आश्रम सांगितले आहेत. ब्रम्हचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम.   
  • ब्रम्हचर्याश्रमात ज्ञान संपादन
  • गृहस्थाश्रमात अर्थार्जन व संसार चालविणे - ऐन उमेदीचा व कर्तृत्वाचा हा काळ
  • वानप्रस्थाश्रमात संसारातून निवृत्ती - आपले ज्ञान व अनुभव इतरांना दान करणे अभिप्रेत असते
  • संन्यासात सर्वसंगपरित्याग करून उर्वरित आयुष्य अध्यात्म चिंतनात व ईश्वर सेवेत घालवावे हे अपेक्षित असते
वानप्रस्थात आपल्या गरजा कमी करणे महत्वाचे.  खाणे तर कमी झालेलेच असते.  मधुमेह वगैरे विकार जडल्यामुळे गोड वगैरे वर्ज्यच असते.  इतरही व्याधीमुळे खाण्यावर बंधने मर्यादा येतात. 

मुले घराबाहेर पडल्यावर मोठे घर खायला उठते.  शिवाय एवढ्या घराची साफसफाईस्वच्छता करता करता मुख्यतः स्त्रियांना / गृहिणींना  नाकी नऊ येतात.  दुमजली घरात वर खाली करून आधीच कुरकुरणारे गुढघे जरा जास्तच जाणीव करून देतात.  अशावेळी सुटसुटीत छोट्याशा घरातओळखीच्या सुहृदांसमवेत गप्पा गोष्टींत वेळ घालवणे नक्किच चांगले.

या जगात वाढलेली आपली मुले इथल्या वेगळ्या संस्कृतीत वाढली आहेत.  त्यांचे जोडीदार बरेचदा / काही वेळा अ-भारतीय संस्कृतीतील परधर्मातील असतात.  त्यांना आपल्यासारखी नात्यांची ओढ नसतेजेष्ठांबद्द्लची आपुलकी / आदर वाटत नाहीअशा परकी वातावरणात आपली अडचण होऊ शकते.  पुढे काय घडणार काहीच सांगता येत नाही.  तहान लागल्यावर विहीर खोदता येत नाही.  आधीपासूनच त्या दिशेने पाऊल उचलणे केंव्हाही श्रेयस्कर

आपली माणसे ३०-४० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ येथे राहत आहेत.  बहुतेकांच्या मनात या बाबतचे विचार आले होतेचर्चा झाल्या होत्यात्या दिशेने काही पावलेही उचलली गेली होती.  पण पुढे काही झाले नाहीकाहीच मूर्त स्वरूप आले नाही.  पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे.  तशी खरं तर वेळ कधीच गेलेली नसते.  

काही वेळा अगदी "मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार” असे नसले तरी उगीच लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजायच्या”, आपण बरे आपले काम बरे. आपण आपली मुले नक्की चांगल्या तऱ्हेने चांगल्या संस्कारात वाढवू व आपल्याला याची कधीच गरज पडणार नाही अशा विचारांतकिंवा कामाच्या व्यापात काळ कधी निघून गेला ते कळलेच नाही.  मुलांवर कितीही ठरवले तरी आपल्या मनाप्रमाणे संस्कार नाही होऊ शकले.  शेवटी संस्कार हे फक्त आईवडलांवरच अवलंबून नसतात.  आजूबाजूचा समाज हाही बरेच घडवत असतो याची जाणीव जरा उशिराच झाली 

आता बरीच जण निवृत्त किंवा निम्न निवृत्त झाली आहेतव्हायच्या वाटेवर आहेत त्यामुळे रोजचा प्रवासठराविक (ठिकाणीकाम याची निकड नाही.  काही जणांची नातवंडे आहेत, पण तरीही त्यांच्या जवळ राहता येत नाही / राहायची गरज नाही. तेंव्हा अमुकच ठिकाणी राहायला पाहिजे असे काही नाही.  सिडनी पासून जरा दूर म्हणजे तासाभराच्या प्रवासाच्या ठिकाणीनिवांत जागीप्रशस्त जागेवर एखादे ठिकाण असेल तर तेथे रम्यस्वच्छप्रदूषण मुक्त वातावरणात आपल्या सुहृदांबरोबर गप्पा गोष्टी करत एकत्र काळ घालवता आला तर काय मजा येईल नाही का?


कुठे?
  • अजूनही १.५ - २ मिलियन डॉलर्स मध्ये ५-१० एकर किंवा त्याहून जास्त जमीन उत्तरेस मध्य-किनारी (central coast) गॉसफर्ड जवळ, वायव्येस बॉक्स हिलजवळ, पश्चिमेस Penrith जवळ, नैऋत्येस Campbelltown जवळ उपलब्ध असतात
  •  खरंतर इथे सिडनीत एवढी मराठी माणसे आहेत की एक वास्तू नक्कीच कमी पडेल व आपण काही वर्षांत सिडनी परिसरात सर्व दिशांना अशा वास्तू उभारू शकू.  पण सुरवातीला आपल्याकडे आलेल्या नोंदी(expression of interest), पैसा व त्यातून शक्य काय होईल ते पाहून एक जागा घेता येईल व वास्तू बांधता येईल. 
  •    मला विश्वास आहे कीएकदा एक वास्तू झाल्यावर त्या अनुभवावर पुढील कार्य जास्त सुकर होईल व चहू दिशांना वास्तू उभ्या राहतील

कसे ?
  •  या सर्व कार्यात पैसा हा महत्वाचा घटक आहे.  तो प्रथम उभारणे जरुरीचे आहे.  त्यातही विविध प्रकारे तो उभारता येईल.  माझी योजना पुढील प्रमाणे आहे.
  •      व्यवहार किंवा अनुदान
    •   व्यवहार - दिलेला पैसा हा गुंतवणूक म्हणून असेल.  त्यावर नियमित ठराविक व्याज दिले जाईल किंवा व्याज देणे सुरवातीला शक्य होणार नाही.  पण उभारलेल्या वास्तूवर अंशतः अधिकार गुंतवणूकदारांचा असेल.  वास्तू युनिट ट्रस्ट च्या स्वरूपात असेल.  वास्तूतील एक खोली गुंतवणूकदाराला आजीवन राहण्यासाठी विना शुल्क मिळेल.  जेवण खाणं व इतर सर्वसाधारण खर्च मात्र नेहमीप्रमाणे भरावा लागेल. 
    • अनुदान / सेवा / भेट - पैसा हा अनुदान / सेवा / भेट म्हणून दिला जाईल.   वास्तूतील एक खोली गुंतवणूकदाराला आजीवन राहण्यासाठी विना शुल्क मिळेल व त्यांच्या हयातीनंतर ती संस्थेला दान समजण्यात येईल.  त्या खोलीस त्यांचे नाव देण्यात येईल व त्यांची आठवण दर वर्षी किमान ५ वेळा (दोघांचा / उभयतांचा जन्मदिनविवाह दिन व स्मृती दिन) काढण्यात येईल.  अशा रीतीने "तुम्हाला मृत्यनंतर अमरत्व" प्राप्त होईल.  कदाचित तुमची मुले तुमची आठवण काढणार नाहीत पण ही संस्था एक प्रकारे तुमचे श्राद्ध करील असे समजायला हरकत नाही.  अर्थात तुमची तशी इच्छा असली तरच म्हणा
  •  प्रमुख गुंतवणूक  Major Investment
    • यात जमिनीच्या अर्ध्याहून जास्त पैसा देणाऱ्याचे नाव त्या जागेला / आश्रमाला वास्तूला देण्यात येईल.  एकाहून जास्त जण तयार झाल्यास त्यांत चढाओढीने (लिलाव) करता येईल.  दुसऱ्या क्रमांकाच्या गुंतवणूकदाराचे नाव प्रमुख इमारतीलासभागृहवाचनालय किंवा इतर इमारती / खोल्यांना देण्यात येईल. 
    • अशा प्रमुख गुंतवणूकदाराना साधारण खर्चातही काही प्रमाणात किंवा जमेल त्याप्रमाणे / योग्य ती सूट देण्यात येईल

कोण 
  • ऑस्ट्रेलियात स्थायिक कुणीही मराठी व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकेल
  •  सत्तरी कडे झुकलेले किंवा सत्तरी ओलांडलेले याबाबत पुढाकार घेऊ शकतील.  श्रम व वेळ देण्याची माझी पूर्ण तयारी आहे
  • निवृत्त व्यक्ती त्यांच्या ऐपती प्रमाणे यात हातभार लावू शकतील. 
  • आपल्या समाजातील विविध व्यावसायिकही आपल्याला याबाबत मदत करतील हा विश्वास आहे
किती ?  
  •   जागेसाठी १.५ - २ मी.  बांधकामासाठी एक खोलीला साधारणतः लाखभर खर्च येई
कधी 
आपण सर्वांनी अगदी मनावर घेतले तर पुढील आर्थिक वर्षातच आपण अशी जागा विकत घेऊ शकू.  त्यावर अधिकचे बांधकाम करून इतर जणांना वर्ष दोन वर्षात तेथे राहायला जाता येईल व मी कालिदास जयंतीला म्हटल्याप्रमाणे खरेच या दशकात २०२० पूर्वी वास्तू शिल्प प्रत्यक्षात येऊ शकेल